Sunday, November 14, 2010

Coyote Hills Regional Park !!!

फक्त एक वेळ जाऊन चालायचे नाहीच...इतकी सुंदर जागा आहे...आणि शिवाय फोटो टिपायला "करोड" जागा आहेत....पुन्हा जावे"च" लागणार. त्यातल्या त्यात काही फोटो .....जे मला आवडलेत..
सुरेख sunset !!! sun(up)set नव्हे !!!

.....का कुणास ठाऊक....मला sunset चे pictures घेण्यात एक वेगळाच आनंद येतो....लोक म्हणतात "उगवत्या सूर्याला सर्वच नमस्कार करतात".....मग मावळत्याचे काय......त्यांना म्हणावे....."पंड्याला" त्याचे फोटू काढायला आवडतात....असो.

आता हे महाशय बघा....तेही photographyच करताहेत....मग लपून लपून का??? इथे युद्ध का चाललेय म्हणावे? सूर्य तिकडून सोनेरी laser किरणांनी लढतोय आणि हे महाशय कॅमेऱ्याच्या चंदेरी laser ने सूर्याला मात देवू पाहताहेत.....सध्याच्या जगात तरी हे शक्य नाही रे बाबा.....तू थोडा लवकर जन्माला आलास!!!

कॅमेराच्या काही functionalities बरोबर खेळ खेळून.....catch केलेली sunset ची अजून एक सुंदर "छटा".......
जसे आम्ही टिपले साहेबाना लपत-छपत फोटो काढताना......"त्या" महाशयांनी देखील मला असेच काहीतरी "out" केले ("टिपणे" म्हटले कि मला फक्त cricket मध्ये गोलंदाजाने फलंदाजाला "टिपले"....हेच आठवते ).....

चला आजपुरता पुरे झाले.....पुढच्या weekend ला पुन्हा एक चक्कर टाकू......सूर्यावर laser रुपी किरणांचा मारा करायला.....!!!!

1 Comments:

Blogger सौरभ said...

आह्हा... कमाल...

November 28, 2010 at 9:06 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home