Saturday, May 15, 2010

साद

मूळातच साद दिली नाही तर
प्रतिसादाची अपेक्षाच राहत नाही
पण सादाला प्रतिसादाच मिळाला नाही तर
अंतर तुटल्यावाचून राहत नाही

मूळातच नाते जुळले नसेल तर
तुटल्याचे दुःख होत नाही
पण जुळलेलं नातं तुटलं तर
वेदनेस अंतर राहत नाही

मूळातच साथ नसेल तर
एकलेपणा जाणवत नाही
पण अर्ध्यावर साथ तुटली तर
आयूष्य पुढे रेटवत नाही.

1 Comments:

Blogger सौरभ said...

!!! दर्द-ए-दिल

November 9, 2010 at 8:59 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home