Saturday, December 11, 2010

Half Moon Bay

मागच्या weekend ला Half Moon Bay ला ओहोटी बघण्याचा योग जुळून आला. एक तासापेक्षा जास्त वेळ drive केल्यावर आणि जवळपास दोन मैल पायी चालून destination ला पोहचलो. चालताना काही चांगले clicks देखील मिळाले. 



पण नशीबाने साथ न देण्याचे आधीच ठरवले होते. काय नशीब बघा न..चालत होतो तोपर्यंत पाण्याचा एकही थेंब नाही....चालणे संपवले, आणि वरुण राजाने झोडपायला सुरुवात केली. आणि कॅमेऱ्याने आपले destination साधले. जो bag मध्ये बसला...बाहेर आलाच नाही. शेवटी मलाच घरी परतावे लागले.

Sunday, November 21, 2010

हा सूर्य अणि तो जयद्रथ !!!


अर्जुना !!! हा सूर्य अणि तो जयद्रथ !!! (बघ काही करता येते का???)


Sunday, November 14, 2010

Coyote Hills Regional Park !!!

फक्त एक वेळ जाऊन चालायचे नाहीच...इतकी सुंदर जागा आहे...आणि शिवाय फोटो टिपायला "करोड" जागा आहेत....पुन्हा जावे"च" लागणार. त्यातल्या त्यात काही फोटो .....जे मला आवडलेत..
सुरेख sunset !!! sun(up)set नव्हे !!!

.....का कुणास ठाऊक....मला sunset चे pictures घेण्यात एक वेगळाच आनंद येतो....लोक म्हणतात "उगवत्या सूर्याला सर्वच नमस्कार करतात".....मग मावळत्याचे काय......त्यांना म्हणावे....."पंड्याला" त्याचे फोटू काढायला आवडतात....असो.

आता हे महाशय बघा....तेही photographyच करताहेत....मग लपून लपून का??? इथे युद्ध का चाललेय म्हणावे? सूर्य तिकडून सोनेरी laser किरणांनी लढतोय आणि हे महाशय कॅमेऱ्याच्या चंदेरी laser ने सूर्याला मात देवू पाहताहेत.....सध्याच्या जगात तरी हे शक्य नाही रे बाबा.....तू थोडा लवकर जन्माला आलास!!!

कॅमेराच्या काही functionalities बरोबर खेळ खेळून.....catch केलेली sunset ची अजून एक सुंदर "छटा".......
जसे आम्ही टिपले साहेबाना लपत-छपत फोटो काढताना......"त्या" महाशयांनी देखील मला असेच काहीतरी "out" केले ("टिपणे" म्हटले कि मला फक्त cricket मध्ये गोलंदाजाने फलंदाजाला "टिपले"....हेच आठवते ).....

चला आजपुरता पुरे झाले.....पुढच्या weekend ला पुन्हा एक चक्कर टाकू......सूर्यावर laser रुपी किरणांचा मारा करायला.....!!!!

Saturday, October 23, 2010

शाळा सुटली...

मास्तर: मुलांनो, आज आपण "भरारी" कशी मारायची ते शिकणार आहोत....

बंड्या (पंड्या) : मास्तर मी प्रात्यक्षिक करून दाखवू ??? चला रे पोरानो.....सर्व मिळून करू या.....प्रात्यक्षिक !!!


Friday, October 15, 2010

waiting bride...


उसने देखा ही नहीं, अपनी हथेली को कभी
उस में धुंधली सी कही मेरी लकीर भी तौ है !!!


Saturday, October 9, 2010

Sunset की Sun(Up)Set ???

पुन्हा एकदा sunset टिपण्याची इच्छा झाली, target होते .....Don Edwards San Francisco Bay National Wildlife Refuge. Sunset ची वेळ चुकू नये म्हणून लगबगीने site कड़े निघालो.

trail वर चालताना अपेक्षेप्रमाणे काही छान clicks मिळालीत....



The intense red colors during the last moments of sunset would make this view incredibly beautiful.


विचार केला, एक फेरफटका मारून पुन्हा या झाडाचा click घेऊ.......पण, निसर्गाच्या मनात काही वेगळेच होते...... क्षितिजावरच्या शुभ्र ढगांनी सूर्याला सर्यास्त होण्यापूर्वीच गिळंकृत केले.


मनातल्या मनात म्हटले..... sunset होण्या आधीच sun-up-set झाला...


Sunday, September 19, 2010

Shoreline Amphitheatre


संपूर्ण weekend काम करून पकायला झालं; म्हणून सहज रविवारी संध्याकाळी Camera फिरवायला घेउन गेलो. बऱ्याच दिवसापासून Shoreline Amphitheater चा Sunset टिपयाचा राहिला होता. मनात विचार आला, चला ही इच्छा देखील पूर्ण करून टाकू. नाहीतरी, कुठला ही lake दिसला की, तिकडचा sunset किंवा sunrise टिपायची मज्जा काही औरच आहे.


Thursday, August 12, 2010

थोड़ी शब्दांची हेराफेरी

Saturday, May 15, 2010

मित्रा, तू जगत रहा.

This is from my collection, don't know the composer.

आशेचे किरण थंडावले असतील....
अपयशाची खापरं विखुरली असतील....
तरीही....मित्रा, तू जगत रहा.

सारे काही सहायचे असते
स्वप्नांच्या हिरव्या वाटेवर.....मनाला दिलासा देत
दोन हुंदके पुसत रहा....मित्रा, तू जगत रहा.


मकरंद कधी शोधायचा नसतो
गंध मात्र चाखायचा असतो
फुलपाखरांचे रंग घेऊन....
स्वप्नांचे पराग वाहत रहा...
मित्रा, तू जगत रहा.

साद

मूळातच साद दिली नाही तर
प्रतिसादाची अपेक्षाच राहत नाही
पण सादाला प्रतिसादाच मिळाला नाही तर
अंतर तुटल्यावाचून राहत नाही

मूळातच नाते जुळले नसेल तर
तुटल्याचे दुःख होत नाही
पण जुळलेलं नातं तुटलं तर
वेदनेस अंतर राहत नाही

मूळातच साथ नसेल तर
एकलेपणा जाणवत नाही
पण अर्ध्यावर साथ तुटली तर
आयूष्य पुढे रेटवत नाही.